Yerawada Pune Crime | पुणे : गाडी पार्कींच्या कारणावरुन मारहाण, मुलीचा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी

0

पुणे : – Yerawada Pune Crime | पार्क केलेली गाडी काढण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन चार जणांनी एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या पत्नी व मुलाल मारहाण केली. तसेच मोबाईलमध्ये शुटींग करणाऱ्या मुलीच्या अंगावर धावुन जात तिच्यासोबत अश्लील कृत्य करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) चार जणांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 30 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत 54 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन नितीन शंकर मोहिते, ऋषीकेश बडेकर, सागर चव्हाण, साईराज जाधव (सर्व रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) यांच्यावर आयपीसी 323, 324, 354, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्यांची पार्क केलेली गाडी काढण्यास सांगितले.

मात्र फिर्यादी यांनी गाडी काढण्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी व मजहर खान यांना मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांच्या लहान मुलाला मारहाण केली. त्यावेळी आरोपींच्या तावडीतून सुटून मुलगा घरात पळाला. त्यावेळी फिर्यादी यांची बहिण दरवाजा लावत असताना आरोपीने तिच्या तोंडावर बुक्की मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला मारहाण केली.

दरम्यान, फिर्यादी यांची मुलगी मोबाईलमध्ये शुटींग करत असल्याचे पाहून आरोपी नितीन व ऋषीकेश तिच्या अंगावर धावून गेले. तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला. आरोपींनी आरडा ओरडा करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याला दुखापत होऊन फिर्यादी जखमी झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.