Ajit Pawar Vs Yugendra Pawar | लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत, अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार लढणार?

बारामती : – Ajit Pawar Vs Yugendra Pawar | अजित पवार यांच्या भाजपसोबत (BJP) जाण्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. पर्यायाने पवार कुटुंबावरही (Pawar Family) त्याचे परिणाम झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha) अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु असताना बारामती विधानसभेच्या निवडणुकीची (Baramati Vidhan Sahba) चर्चा रंगू लागली आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात विधानसभेला कोण उमेदवार असणार असे विचारले असता बारामतीकरांनी थेट युगेंद्र पवारांचं नाव घेतलं आहे.

बारामतीकर म्हणाले, बारामतीला विधानसभेत नव्या चेहऱ्याची गरज आहे. त्यात युगेंद्र पवार हा तरुण आणि चांगला चेहरा आहे. आम्हाला बारामतीत नवीन आमदार हवा आहे. आतापर्यंत बारामतीत अजित पवारांना निवडून आणलं त्यांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. आता मात्र बारामतीचा भावी आमदार कोण विचारल्यास थेट युगेंद्र पवारांचं नाव घेतलं आहे. भावी आमदार म्हणून युगेंद्र पवारांच्या नावाला पसंती दिली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी काकाऐवजी आजोबांना साथ देण्याचं ठरवलं आहे. उद्योजक असणारे युगेंद्र पवार हे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. युगेंद्र हे युवा नेतृत्व आहेत. शांत स्वभाव आणि संयमी व्यक्तीमत्व या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. नेतृत्व केलं पाहिजे, असं त्यांचं ठाम मत आहे. त्यासाठी ते तरुणांना प्रोत्साहन देत आहेत.