Pune Hadapsar Crime | पुणे : चॉकलेच्या बहाण्याने चार वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार

0

पुणे : – Pune Hadapsar Crime | घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कात्रज परिसरात बुधवारी (दि.3) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 27 वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 20 ते 22 वर्षीय अनोळखी तरुणावर आयपीसी 354 (अ), 363, 366 (अ), 323, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चार वर्षाची मुलगी वस्तीमधील लहान मुलांसोबत खेळत होती. आरोपीने मुलीला चॉकलेट देतो असे म्हणून तिला शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. त्याठीकाणी मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी रडू लागल्यानंतर तिला मारहाण केली. तसेच रडली तर कापून टाकीन अशी धमकी दिली. पत्र्याच्या शेडमधून मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने परिसरात राहणाऱ्या तरुणाने शेडमध्ये गेला. तरुणाला पाहताच आरोपीने त्याला धक्का मारून पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.