IAS Saurabh Rao | सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्त पदी नियुक्ती

0

मुंबई : IAS Saurabh Rao | राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या Brihanmumbai Municipal Corporation (BMC) आयुक्तपदी सनदी अधिकारी भूषण गगराणी (IAS Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव यांची नियुक्ती केली आहे. ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर (IAS Abhijit Bangar) यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी केली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर राज्य सरकारने आज (बुधवार) भूषण गगराणी यांची नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.(IAS Saurabh Rao)

याशिवाय सौरभ राव यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी आणि कैलाश शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या
बदल्या केल्या आहेत. यानंतर आज तीन बड्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले.
नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सचिव एस.के. दास यांनी काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.