Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्न करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर चाटींग करुन विश्वास संपादन केला. त्यानंतर तू मला खूप आवडतेस असे म्हणत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तरुणावर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2022 ते 2023 या कालावधीत पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच तरुणीच्या राहत्या घरात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सातववाडी हडपसर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.7) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अमर शिवचरन जमादार (वय-28 रा. मु.पो. भोरी कवटे ता. अक्कलकोट जि. सोलापूर) याच्यावर आयपीसी 354(अ), 354(ड), 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकाच ठिकाणी कामाला आहेत. पीडित तरुणी काम करत असताना आरोपीने त्या ठिकाणी थांबून तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तरी देखील आरोपीने तरुणीचा पाठलाग केला. तसेच तिचा फोन नंबर घेवुन तिच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर चाटींग करु लागला.

तु मला खुप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे बोलून तरुणीला विश्वासात घेतले. तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला सांगितले तर लग्न करणार नाही अशी धमकी दिली. तसेच पीडित तरुणी राहात असलेल्या घरी जाऊन घरमालकाला फिर्यादीचा पती असल्याचे सांगून घरी आला. घरामध्ये आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए. ईनामदार करीत आहेत.

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR
Pune Crime News | वेजीटा रुफ टॉप हॉटेलमधील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, दोघांवर FIR (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.