Pune Pimpri Chinchwad Crime News | वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने तिघांची 22 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार; मुंबईतील दोघांवर FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटल (Bharati Vidyapeeth Hospital) धनकवडी आणि सुमितीभाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर (Sumatibhai Shah Ayurved Mahavidyalaya Hadapsar) येथे प्रवेश देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी तिघांची 22 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत औरा हॉस्पिटल (Aura Hospital) जवळ भारती विद्यापीठ हॉस्पिटल धनकवडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत ओंकार चंद्रकांत पवार Omkar Chandrakant Pawar (वय-20 रा. मुपो. वेल्हे, पवार मळा, वेल्हे) यांनी मंगळवारी (दि.19 डिसेंबर) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सौरभ सुनिल कोडग Saurabh Sunil Kodag (वय-22 रा. जमीलनगर, वेस्ट मुंबई), संतोष काशीनाथ पवार Santosh Kashinath Pawar (वय-50 रा. विरार, ईस्ट मुंबई) यांच्यावर आयपीसी 406, 420, 465, 468, 469, 471, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार यांना वैद्यकीय प्रवेश (Medical Admission) घेयचा होता. आरोपींनी ओंकार याचा विश्वास संपादन करुन त्यांना भारती विद्यापीठ हॉस्पिटल धनकवडी येथे बी.ए.एम.एस (BAMS) या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींचा कोणत्याही शैक्षणिक संस्थेशी कायदेशीर संबंध नसताना फिर्यादी ओंकार पवार याच्याकडून 13 लाख 20 हजार रुपये घेतले. तसेच बनावट अलॉटमेंट लेटर दिले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आरोपींनी फिर्यादी यांच्यासह सयाजी मोहिते व रुपाली काळे यांची देखील आर्थिक फसवणूक केली. सयाजी मोहिते यांचा मुलगा आदित्य व रुपाली काळे यांच्या मुलीला हडपसर येथील सुमितीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी सयाजी मोहिते यांच्याकडून 7 लाख रुपये तर काळे यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये घेतले. त्यांना देखील बनावट बील पावत्या देऊन फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली.
याबाबत फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन सौरभ कोडग व संतोष पवार
यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक तावडे (API Tawde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.