Pune Police MPDA Action | पर्वती परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 70 वी स्थानबध्दतेची कारवाई

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | पर्वती पोलीस ठाण्याच्या (Parvati Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार यश उर्फ मनोज दिनेश मेरवाडे (वय-22 रा. दांडेकर पुल, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 70 वी कारवाई आहे.

यश उर्फ मनोज मेरवाडे पर्वती पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, तलवार, लोखंडी रॉड, बांबू या सारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते.

यश उर्फ मनोज मेरवाडे याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) कारवाई करण्याचा
प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी यश उर्फ मनोज मेरवाडे याला एम.पी.डी.ए
कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr. PI Jairam Paigude), गुन्हे शाखा,
पी.सी.बी. चे (Crime Branch P.C.B.) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre),
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.