Pune Crime News | पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 18 लाख रुपयांची बॅग पळवून नेली. याप्रकरणी भोंदूबाबा सह चार जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ससाणेनगर येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत विनोद छोटेलाल परदेशी Vinod Chhotelal Pardeshi (रा. रामनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपआपसांत संगनमत करुन फिर्य़ादी यांची फसवणूक (Cheating)
करण्याच्या उद्देशाने पैशांचा पाऊस (Raining Money) पाडतो असे खोटे सांगितले. फिर्यादी यांना पैशांचा पाऊस पाडून
पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना ससाणेनगर येथील युनिव्हर्सल शाळेशेजारी
(Universal School) राहणाऱ्या विशाल बिनावत यांच्या घरी बोलावून घेतले. फिर्यादी 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री
18 लाख रुपये घेऊन आरोपींनी सांगितलेल्या घरी आले. आरोपींनी फिर्यादी यांची नजर चुकवून 18 लाख रुपयांची
बॅग पळवून नेली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.