Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Saving Tips | प्राप्तीकर (Income Tax) जमा करताना आपण बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून्, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund-PPF), विमा पॉलिसी (Insurance), गृहकर्ज (Home Loan) आणि भाडे यासारख्या बाबींच्या आधारे सूट मिळवू शकता. कर वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कर वाचवू शकता. तसेच तुमची बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता. (Income Tax Saving Tips)

याशिवाय, काही अप्रत्यक्ष मार्ग देखील आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही कर वाचवू शकता. यामध्ये पालकांच्या नावावर काही विमा योजना किंवा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. येथे आपण कर वाचवण्याचे तीन मार्ग पाहणार आहोत. या बचत पद्धती अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत ज्यांचे पालक कराच्या कक्षेबाहेर आहेत किंवा त्यांचे उत्पन्न करपात्र (Taxable Income) उत्पन्नापेक्षा कमी आहे.

आई-वडिलांना भेट द्या (Gift to Parents)
तुम्ही तुमचे करपात्र उत्पन्न तुमच्या पालकांना भेट देऊ शकता आणि त्यांच्या नावावर गुंतवणूक करू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी मूळ कर सवलत (Tax Exemption Limit) मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर कक्षेच्या बाहेर येतात. (Income Tax Saving Tips)

तसेच, बँक किंवा पोस्ट ऑफिस डिपॉझिटवर मिळवलेले 50,000 रुपयांपर्यंतचे व्याज ज्येष्ठ नागरिकांसाठी करमुक्त आहे. तुमच्या पालकांचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असले तरीही तुम्ही त्यांच्या नावावर त्यांच्या कर स्लॅबनुसार गुंतवणूक करून कर सवलत मिळवू शकता. पालकांना त्यांच्या मुलाकडून मिळालेली रोख भेट करमुक्त आहे. आणि अशा गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न करपात्र उत्पन्नात जोडले जाणार नाही.

आई-वडिलांसाठी आरोग्य विमा (Health Insurance For Parents)
तुमच्या पालकांकडे कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी आरोग्य पॉलिसी घेऊ शकता.
प्राप्तिकराच्या कलम 80डी अंतर्गत, पालकांचे वय 60 वर्षांच्या आत असल्यास
आरोग्य विम्यावर 25,000 रुपयांच्या कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
जर पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर कर सूट मर्यादा 50,000 रुपये आहे.
विशेष बाब म्हणजे करातील ही सूट कलम 80डी अंतर्गत 25,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा वेगळी आहे.
तुम्ही कलम 80डी अंतर्गत तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्यावर कर सूट मिळवू शकता.

आई-वडिलांना भाडे देऊन (Claim HRA on Rent)
तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना भाडे देऊन कर वाचवू शकता.
लक्षात ठेवा की मालमत्ता पालकांच्या नावावर असावी.

अपंग पालकांच्या सेवेत कर सूट
अपंग पालकांवर झालेल्या खर्चावर तुम्ही प्राप्तीकराचा दावा करू शकता. प्राप्तीकराच्या कलम 80DD अंतर्गत, जर एखाद्याचे पालक अपंग असतील तर ती व्यक्ती प्राप्तीकरात सूट घेऊ शकते.

40 टक्के अपंग पालकांना 75 हजार रुपयांपर्यंतच्या खर्चावर करमाफीचा लाभ मिळतो.
जर कुटुंबात दोन भाऊ असतील, दोघेही आपल्या आई-वडिलांवर खर्च करत असतील, तर त्यांचा खर्च किती आहे, हे पाहिले जाईल. जर दोन्ही भावांनी 75-75 हजार रुपये खर्च केले, तर दोन्ही भाऊ प्राप्तीकराचा दावा करू शकतात.

Web Title :- Income Tax Saving Tips | income tax saving tips on parents insurance and investment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission DA Hike | एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी-पेन्शनर्सला लागली लॉटरी, 3 टक्के वाढणार DA; आता इतकी मिळेल पेन्शन

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

Leave A Reply

Your email address will not be published.