7th Pay Commission DA Hike | एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी-पेन्शनर्सला लागली लॉटरी, 3 टक्के वाढणार DA; आता इतकी मिळेल पेन्शन

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांना 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी (Budget 2022) केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. महागाई दराचे (AICPI) आले आहेत. यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (Central government Employees) महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 2 नव्हे तर 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील पगारात त्यांना 34 टक्के डीए मिळेल. (7th Pay Commission DA Hike)

पेन्शनधारकांसाठीही (Pensioners) नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे.
मोदी सरकारने (Modi Government) पेन्शनधारकांच्या महागाई मदत (Dearness Relief, DR) मध्येही वाढ केली आहे. लवकरच निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात महागाई मदतीचे पैसे हस्तांतरित केले जातील. शासनाने त्यास मान्यता दिली आहे.
सरकारने पेन्शनधारकांच्या महागाईच्या मदतीत 8,700 रुपयांची वाढ केली आहे.

केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 6 महिन्यांत सुधारणा करते. कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर त्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेगवेगळा महागाई भत्ता मिळत आहे. जुलै 2021 पर्यंत, डीए 31 टक्क्यांपर्यंत वाढला होता. 2021 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये सुमारे 14 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्त्याची कोणतीही थकबाकी मिळणार नाही (No Arrear of Dearness Allowance). जुलै 2021 मध्ये DA-DR बाबत सरकारचा जो काही निर्णय असेल, तो एक-एक करून अमलात आणला जाईल. उल्लेखनीय आहे की, कोरोना व्हायरस महामारी (coronavirus Pandemic) मुळे सरकारने 1 जानेवारी 2020 ते 1 जुलै 2021 पर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्यावर बंदी घातली होती. (7th Pay Commission DA Hike)

जुलै 2021 मध्ये, महागाई भत्ता एकच 11 टक्क्यांनी वाढवण्यात आला.
त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये, जानेवारी-जून सहामाहीसाठी डीएमध्ये 3 ने वाढ करण्यात आली.
1 जुलै 2021 पर्यंत पेन्शनधारकांच्या महागाई मदत (DR) च्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

दुसरीकडे, पेन्शनधारकांसाठीही एक आनंदाची बातमी आहे.
सरकारने त्यांच्या पेन्शन खात्यात वाढीव महागाई मदत (DR)
हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. सरकारने बँकांना सांगितले आहे
की ज्या पेन्शनधारकांचा डीआर वाढला (DR Hike) आहे त्यांच्या पेन्शनची गणना करा आणि त्याचे पेमेंट करण्यास सुरुवात करा. यासाठी बँकांनी संबंधित विभागाच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही.

 

या लोकांना होईल फायदा
केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयानुसार, केंद्रीय नागरी पेन्शनधारक
(Central Civil Pensioners), स्वातंत्र्य सैनिक (Freedom fighters – SSS योजना),
सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती (Justices of the Supreme Court),
लोकसभेचे सदस्य (Members of Parliament) आणि इतर पेन्शनधारकांना सरकारच्या नवीन आदेशाचा लाभ मिळेल.

येथे जाणून घ्या, कोणाला मिळणार किती पेन्शन ?
अंदमानचे माजी राजकीय कैदी/त्यांचे पती किंवा पत्नी (Ex-Andaman Political prisoners/spouses) ची पेन्शन 30,000 रुपये प्रति महिना वरून 38,700 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. भारताबाहेर पीडित होते अशा स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन 28,000 रुपयांवरून 36,120 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. आझाद हिंद फौज (INA) सह इतर स्वातंत्र्य सैनिकांना आता 26,000 रुपयांऐवजी 33,540 रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे. आश्रित पालक/पात्र मुलीला मिळणार्‍या पेन्शनची रक्कम 15,000 रुपयांवरून 19,350 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.

Web Title :-  7th Pay Commission DA Hike | 7th pay commission 3 percent da hike confirm for employees of central govt pension increased by rs 8700

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

Leave A Reply

Your email address will not be published.