LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Kanyadan Policy | लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची पॉलिसी लोकांना अनेक फायदे देते. अनेक पॉलिसींवर, गुंतवणूकदारांना विमा फायदे तसेच मोठी रक्कम दिली जाते. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy) आहे. जिचा उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी पालकांना बचत उपलब्ध करून देणे हा आहे.

मॅच्युरिटीनंतर या योजनेत मोठी रक्कम मिळते. ही योजना एलआयसीच्या जीवन लक्ष्य योजने (Jeevan Lakshya Scheme) चे कस्टमाईज्ड व्हर्जन आहे, परंतु कंपनी ती कन्यादान पॉलिसी नावाने विकते.

ही योजना छोट्या ते मोठ्या रकमेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये निश्चित उत्पन्नासोबतच सुरक्षिततेची हमीही आहे. या योजनेंतर्गत जर कोणी दररोज 125 रुपये जमा करत असेल तर त्याला मॅच्युरिटीवर 27 लाख रुपये मिळतील. या योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे, परंतु केवळ 22 वर्षांपर्यंतच मॅच्युरिटी जमा करावी लागेल. (LIC Kanyadan Policy)

यादरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागणार नाही. यासोबतच, पॉलिसीच्या उर्वरित वर्षांमध्ये मुलीला दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळेल. या पॉलिसी अंतर्गत 2 वर्षांनंतर कर्ज देखील घेता येते. यासोबतच कराचा लाभही दिला जातो.

वडिलांच्या मृत्यूनंतरही सुरू राहिल येाजना
वडिलांचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत संपत नाही. या कारणास्तव, असे म्हणता येईल की या पॉलिसीमध्ये, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.

यासोबतच 10 टक्के विमा रक्मही मिळते. या पॉलिसीची मुदत 13-25 वर्षे आहे. ज्यामध्ये मासिक, त्रैमासिक,
सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केला जाऊ शकतो.
त्याअंतर्गत 18 ते 50 वर्षे वयोगटाची मुदत देण्यात आली आहे. तर कमाल परिपक्वता वय 65 वर्षे आहे.

कसे मिळतील 27 लाख रुपये
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेअंतर्गत 10 लाखांची विमा रक्कम घेतली, तर अपघाती लाभ रायडरसह वार्षिक प्रीमियम 43011 रुपये,
सहामाही प्रीमियम रुपये 21738, तिमाही प्रीमियम रुपये 10986 आणि मासिक रुपये 3663 असेल.
म्हणजेच दररोज सुमारे 125 रुपयांची बचत करावी लागणार आहे. त्यानंतर 25 वर्षानंतर तुम्हाला सुमारे 27 लाखांची रक्कम मिळेल.

Web Title :- LIC Kanyadan Policy | investment in lic kanyadan policy you can get an amount around 27 lakhs

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम

7th Pay Commission DA Hike | एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी-पेन्शनर्सला लागली लॉटरी, 3 टक्के वाढणार DA; आता इतकी मिळेल पेन्शन

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Leave A Reply

Your email address will not be published.