भाजपाच्या नेतृत्वात मत्सर आणि द्वेषभावना; खडसेंचा पुन्हा हल्लाबोल!

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर आणि द्वेषभावना असल्याची टिका भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना खडसे बोलत होते.

याप्रसंगी, राज्यातील भाजपा नेतृत्वावर निशाणा साधताना खडसे म्हणाले की, निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यामागे राजकारण होते. रोहिनी खडसे तिकीट मागत नव्हत्या, तरीही त्यांना देण्यात आले. जाणिपूर्वक अपमानास्पद वागून दिली जाते, हा विश्वासघात आहे. आधी असे राजकारणात होत नव्हते. गोपीनाथ मुंडे असते तर ही आली वेळ नसती. गोपीनाथ मुंडे असताना आम्ही नेहमी हसत-खेळत राजकारण केले. त्यांच्या संघर्षामुळे भाजपाला सध्या चांगले दिवस आले. गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांचे आधार होते. ते पाठीत खंजीर खुपसणारे नव्हते, असे म्हणत पंकजा आणि रोहिणीच्या पराभवामागे षडयंत्र होते, असा आरोप खडसे यांनी केला.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.