Sujata Saunik | राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; जाणून घ्या

0

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिव पदी सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. सेवा जेष्ठतेनुसार सौनिक यांची वर्णी लागली आहे. सुजाता यांचे पती मनोज सौनिक यांनीही या अगोदर राज्याचे मुख्य सचिव म्हणून धुरा सांभाळलेली आहे.

सुजाता सौनिक या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. सुजाता सौनिक या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सेवा जेष्ठतेनुसार सुजाता सौनिक या वरिष्ठ होत्या. यानंतर राजेश कुमार (१९८८), इकबालसिंह चहल (१९८९) हे दावेदार होते.

सुजाता यांची नियुक्ती झाल्याने पती-पत्नी असे दोघेही मुख्य सचिव पदावर काम करण्याची पहिलीच वेळ आहे. सुजाता सौनिक या मुळच्या पंजाबच्या आहेत. मनोज सौनिक हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आहेत. मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर, सरकारने सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव करण्याचा विचार टाळला होता. त्यांच्या जागी १९८८ च्या बॅचमधील नितीन करीर यांना संधी देण्यात आली होती.

३१ डिसेंबर रोजी नियुक्त झालेले करीर हे या वर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. करीर यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढविण्यात आला होता. अखेर करीर यांच्या नंतर सुजाता सौनिक यांना संधी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.