Reliance Jio-Airtel 5G Data Prices | जिओ नंतर एअरटेलनेही 5G प्लानच्या किंमती वाढवल्या; 3 जुलैपासून लागू होणार दरवाढ

0

मुंबई : Reliance Jio-Airtel 5G Data Prices | भारतातातील आघाडीची टिलिकॉम कंपनी जिओ ने आपल्या प्लानच्या किमती वाढवलयानंतर आता एअरटेलने देखील आपल्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. ही दरवाढ येत्या जुलैपासून लागू होणार आहे. या दरवाढीचा लाखो वापरकर्त्यांना याचा फटका बसणार आहे.

जिओने देखील आपल्या प्लानच्या किंमती सुमारे २० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. जिओच्या २ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉईस आणि एसएमएस प्लानची किंमत १५५ रुपयांवरून १८९ रुपये करण्यात आली. अनलिमिटेड व्हॉईस, एसएमएस आणि दररोज १ जीबी 5G डेटा देणाऱ्या प्लानची किंमत पूर्वी २८ दिवसांसाठी २०९ रुपये होती, ती आता २४९ रुपये झाली.

वार्षिक जिओ अनलिमिटेड प्लानपूर्वी २ हजार ९९९ रुपये होता, आता त्यासाठी ३ हजार ५९९ रुपये मोजावे लागणार आहेत. अनलिमिटेड व्हॉईस, एसएमएस आणि दररोज २ जीबी ५ जी डेटा देणारा प्लान पूर्वी २९९ रुपये होता, तो आता २८ दिवसांसाठी ३४९ रुपये झाला आहे. ५३३ रुपयांच्या प्लानची किंमत आता ६२९ रुपये झाली आहे. पोस्टपेड प्लॅनमध्येही वाढ झाली असून, ३० जीबी डेटा प्लॅन आता २९९ रुपयांऐवजी ३४९ रुपयांपासून सुरू होणार आहे. याशिवाय, १ जीबी डेटा असलेला बेस प्लान १५ रुपयांवरून १९ रुपये करण्यात आला.

यानंतर आता एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेट अशा दोन्ही ५G प्लानच्या किंमतींमध्ये बदल केला आहे. प्रीपेड अनलिमिटेड व्हॉईस प्लानची किंमत १७९ रुपयांऐवजी १९९ रुपये केली आहे. तर, ४५५ रुपयांच्या प्लानची किंमत ५०९ रुपये आणि १ हजार ७९९ रुपयांच्या प्लानची किंमत १ हजार ९९९ रुपये करण्यात आली.

२६५ रुपयांचा प्लान आता २९९ रुपये, २९९ रुपयाचा प्लान ३४९ रुपये, ३५९ रुपयांचा प्लान ४०९ रुपये, ३९९ रुपयांचा प्लान ४४९ रुपये, ४४९ रुपयांचा प्लान ६४९ रुपये, ७१९ रुपयांचा प्लान ८५९ रुपयांचा आहे. ८३९ रुपयांचा प्लान ९७९ रुपये आणि २ हजार ९९९ रुपयांचा प्लान साठी आता ३ हजार ५९९ रुपये द्यावे लागणार आहेत.

याव्यतिरिक्त डेटा पॅकमध्येही किमती वाढलेल्या आहेत. १९ रुपयांच्या प्लानची किंमत आता २२ रुपये, २९ रुपयांच्या प्लानची किंमत ३३ रुपये आणि ६५ रुपयांच्या प्लानची किंमत ७७ रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.