Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरणारा गजाआड

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल जबरस्तीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.28) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास भोसरी येथील पी.एम.टी. बस स्टॉप येथे घडली होती. शिवा रामलु (वय-25 रा. मेहमुदनगर, तेलंगणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In Mobile Theft Case)

याबाबत नितीन यशवंत भुरकुंडे (वय-29 रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्य़ादी भोसरी येथील पीएमटी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्या हातातील तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेला. याबाबत नितीन यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

खासगी बसमधून दोन महिलाचे 9 लाखांचे दागिने लंपास

पिंपरी : पुणे ते मुंबई दरम्यान खासगी बसने प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या पर्समधून चोरट्याने नऊ लाख 34 हजार रुपये किमतीचे 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि.28) मध्यरात्री एकच्या सुमारास उर्से टोलनाका येथील फुटमॉल येथे उघडकीस आली. याप्रकरणी बावधन येथील 38 वर्षीय महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला शुक्रवारी रात्री व्हीआरएल ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसमधून पुणे ते मुंबई असा प्रवास करत होत्या. उर्से टोलनाका येथील फुडमॉल येथे बस थांबल्याने त्या बसमधून खाली उतरल्या. त्यावेळी महिलेच्या पर्समधून 6 लाख 74 हजार रुपये किमतीचे 12.9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच बसमधीस सहप्रवासी महिलेचे दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे दागिने चोरट्याने लंपास केले. बसमध्ये आल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.