Indian Railways | ट्रेनमध्ये महिलेच्या बॅगची चोरी, कोर्टाने रेल्वेला दिला 1 लाख रुपये देण्याचा आदेश; काय आहे नियम?

0

नवी दिल्ली : Indian Railways | ट्रेनमध्ये महिलेच्या सामानाची चोरी झाल्यानंतर ग्राहक मंचाने रेल्वेला १.०८ लाख रुपये भरण्यास सांगितले आहेत. दिल्लीच्या एका ग्राहक मंचाने भारतीय रेल्वेला बेजबाबदारपणा आणि सेवेत कमतरता यासाठी जबाबदार ठरवले. यासोबतच महिलेला १.०८ लाख रुपये देण्याचा आदेश जारी केला आहे. दिल्लीच्या जया कुमारी मालवा एक्सप्रेसच्या आरक्षित कोचने प्रवास करत होत्या. यादरम्यान त्यांचे सामान चोरीला गेले. प्रकरणाची सुनावणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे (केंद्रीय जिल्हा) चेयरमन इंद्रजीत सिंह आणि सदस्य रश्मी बन्सल यांनी केली होती.

तक्रारदार महिला जया कुमारी यांची बाजू वकील प्रशांत प्रकाश यांनी मांडली. जया यांच्यानुसार जानेवारी २०१६ मध्ये मालवा एक्सप्रेसमध्ये झांसी आणि ग्वाल्हेर दरम्यान त्यांच्या कोचमधील काही अशा लोकांनी त्यांची बॅग चोरली ज्यांकडे आरक्षण नव्हते. याबाबतची माहिती त्यांनी ताबडतोब टीटीईला दिली होती. यासोबतच रेल्वे प्रशासनाला या घटनेबाबत दोन वेळा लेखी तक्रार नोंदवली. परंतु, त्यांच्या तक्रारीवर कोणतीही सुनावणी झाली नाही.

तक्रारीत म्हटले होते की, प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासह त्यांच्या सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा घ्यावी. तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा पीडित महिलेला सामान परत मिळाले नाही. सुनावणीनंतर ग्राहक मंचाने म्हटले की, तक्रारदाराने दिल्लीहून ट्रेन पकडली होती आणि त्यांना इंदौरला जायचे होते. यासाठी पूर्ण प्रकरणात सुनावणी घेण्याचा रेल्वेला अधिकार होतो.

जया कुमारी यांनी आपले सामान ठेवताना बेजाबदारपणा केल्याचे रेल्वेचे म्हणणे ग्राहक मंचाने फेटाळला. ग्राहक मंचाने म्हटले की, जर रेल्वे अथवा त्यांचे कर्मचारी यांच्याकडून बेजबाबदारपणा झाला नसता तर सामान चोरी झाले नसते. आयोगाने म्हटले की, महिलेला ८०,००० रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. महिलेला झालेल्या त्रासाबद्दल २०,००० रुपये आणि ८,००० रुपयांचा खर्च देण्याचे आदेश दिले.

ट्रेनमधून सामान चोरी होण्याबाबत काय आहे नियम?

आरक्षित कोचमध्ये प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेची आहे. प्रवाशांनी आपले सामान आपल्या जवळ ठेवावे. सामान चोरी झाल्यास ताबडतोब रेल्वे कर्मचारी (जसे की टीटीई, आरपीएफ अधिकारी) यांना माहिती द्यावी. रेल्वे कर्मचारी प्रवाशाची तक्रार नोंदवण्यास मदत करतील. प्रवाशाच्या एफआयआरच्या आधारावर रेल्वे प्रशासन आणि आरपीएफ तपास करते. काही प्रकरणात प्रवाशांना नुकसान भरपाई मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.