Reliance Jio Hikes Tariff | मुकेश अंबानी यांनी दिला जोरदार झटका, 25% पर्यंत महागले Jio चे रिचार्ज प्लान, जुलैपासून वाढणार मोबाईल बिल

0

नवी दिल्ली : Reliance Jio Hikes Tariff | आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या यूजर्सला झटका देत टॅरिफ प्लान महाग केले आहेत. जिओने ३ जुलैपासून आपले सर्व रिचार्ज प्लानचे दर वाढवले आहेत. (Jio Recharge Plan)

एकाचवेळी कंपनीने मोठी वाढ करत टॅरिफ १२.५ टक्केपासून २५ टक्केपर्यंत वाढवले आहे. स्पेक्ट्रमचा लिलाव बंद झाल्यानंतर टेलीकॉम कंपन्यांनी टेरिफ दर वाढवण्याची तयारी केली आहे. कंपनी जुलैपासून मोबाईल रिचार्ज प्लान १५ ते २०% पर्यंत वाढवू शकते. या रेसमध्ये जिओ सर्वात पुढे निघाली आहे, तर वोडाफोन आयडिया, एअरटेल सारख्या कंपन्यासुद्धा आपले टेरिफ प्लान महाग करण्याच्या तयारीत आहेत.

रिलायन्स जिओने आपले प्रीपेड प्लान महाग केले आहेत. कंपनीने आपले टेरिफ प्लान २५ टक्केपर्यंत महाग केले आहेत. जिओने आपल्या प्रीपेड प्लानमध्ये १२.५ टक्केपासून २५ टक्केपर्यंतची वाढ केली आहे. कंपनीने १९ प्लानच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यामध्ये १७ प्रीपेड आणि २ पोस्ट पेड आहेत.

या वाढीबाबत रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेयरमन आकाश अंबानी यांनी म्हटले की, नव्या योजनांची सुरुवात करायची आहे, कंपनीला पुढे न्यायचे आहे, तसेच ५जी आणि एआय तंत्रज्ञानात गुंतवणुक करायची असल्याने ही वाढ केली आहे. दरम्यान कंपनीने वाढीनंतर सर्वात कमी रिचार्जची किमत वाढवून १९ रुपये केली आहे. हे एक जीबी डाटा अ‍ॅड-ऑन-पॅक आहे, ज्याची किमत १५ रुपये होती.

कोण-कोणते प्लान झाले महाग

  • ७५ जीबी पोस्टपेड डेटा प्लान आता ३९९ रुपयावरून वाढून ४४९ रुपये.
  • ८४ दिवसांचा ६६६ रुपयांचा अनलिमिटेड प्लान आता २० टक्के वाढल्याने ७९९ रुपये.
  • अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लानच्या किमती वाढून १,५५९ रुपयावरून १,८९९ रुपये आणि २,९९९ रुपयावरून ३,५९९ रुपये.
  • सर्व दोन जीबी प्रतिदिन आणि त्यापेक्षा जास्तच्या प्लानवर अनलिमिटेड ५जी डेटा उपलब्ध होईल.
  • २९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान वाढून ३४९ रुपये आणि ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान आता ४४९ रुपये केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.