Gautam Adani | गौतम अदानी आता नाहीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…, 16 महिन्यानंतर मिळाले होते स्थान, शेयर बाजार त्सुनामीत गेला मुकुट

नवी दिल्ली : Gautam Adani | लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या (Lok Sabha Election Results 2024) दिवशी शेयर बाजारात त्सुनामी दिसून आली. शेयर बाजारात गुंतवणुकदारांचे लाखो करोड रुपये बुडाले, तसेच दिग्गज भारतीय अरबपतींना जोरदार झटका बसला. गौतम अदानींपासून मुकेश अंबानींपर्यंत (Mukesh Ambani) सर्वांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. मात्र, सर्वात जास्त नुकसान अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे झाले. त्यांना दुप्पट फटका बसला.

बाजारातील घसरणीमुळे त्यांचे २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर नेटवर्थ कमी झाल्याने त्यांचा आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मुकुटसुद्धा गेला.

मंगळवारी जसजसा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत गेला, शेयर बाजार कोसळण्याचा नवीन रेकॉर्ड होत गेला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेयरचा सेन्सेक्स ६००० अंकापेक्षा जास्तीने घसरला.

तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-५० सुद्धा १९०० अंकापेक्षा जास्तीने कोसळला. मात्र, मार्केट बंद होता-होता सेन्सेक्समध्ये २००० अंक आणि निफ्टी-५० मध्ये सुमारे ७०० अंकांची रिकव्हरी दिसून आली.

शेयर बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे अरबपती गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाले. ब्लुमबर्ग मिलिनियर्स इंडेक्सनुसार, त्यांचे नेटवर्थ एकाच दिवसात २४.९ अरब डॉलर अथवा २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कमी झाले.

या घसरणीनंतर गौतमी अदानींची नेटवर्थ १०० अरब डॉलरच्या खाली जाऊन ९७.५ अरब डॉलर झाले. यानंतर मुकेश अंबानी पुन्हा आशियातील नंबर-१ श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.