Pune Crime News | पुणे: सरकारी कार्यालयात महिलेला अश्लील शिवीगाळ, गुन्हा दाखल

0

पुणे : Pune Crime News | शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत पुणे (Central Building Pune) येथे घडला आहे.

याबाबत 42 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्रु नामदेव खवळे (रा.डॉ. राममनोहर लोहीया नगर, पुणे) याच्याविरोधात आयपीसी 353, 354, 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शासकीय कार्यालयात काम करतात. गुरुवारी दुपारी फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मोठमोठ्याने बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात तुला आता सरळ करतो असी धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अश्लील मेसेज पाठवून विनयभंग

पुणे : शाळेच्या सुचनेवरुन एका अल्पवयीन मुलीने ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर लिंक पाठवून इतर मुलांना याची माहिते देण्यास शाळेने मुलीला सांगितले होते. त्यानुसार मुलीने ग्रुप वर लिंक पाठवली. त्यानंतर तीन अल्पवयीन मुलांनी अश्लील मसेज करुन मुलीचा विनयभंग केला (Molestation Case). तसेच इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पिडीत मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.24) दुपारी चारच्या सुमारास घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.