Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: ‘तुला लय माज आलाय का’ म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, दोघांवर गुन्हा दाखल

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.24) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माण येथील बोडकेवाड फाटा (Bodkewad Phata Man) येथे घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जखमी आदर्श गौतम भोसले (वय-20 रा. भोसले वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी मंगळवारी (दि.25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राहुल ठाकर, सनी ठाकर यांच्याविरोधात आयपीसी 326, 341, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांच्यात सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बाचाबाची झाली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी रात्री मित्रासोबत दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपी पाठीमागून दुचाकीवर आले. त्यांनी फिर्य़ादी यांची दुचाकी अडवून ‘तुला लय माज आलाय का’ असे म्हणून शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर सनी ठाकूर याने सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने आदर्श भोसले याच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.