MLAs Resigns From Maharashtra Vidhan Sabha | महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे; विधानसभा अध्यक्षांनी वाचून दाखवली नावे

0

मुंबई : MLAs Resigns From Maharashtra Vidhan Sabha | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्व आहे. दरम्यान विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आज सकाळी ११ वाजता अधिवेशनास सुरुवात झाली. ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांची नावे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवली. राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.

यामध्ये निलेश लंके – पारनेर विधानसभा ,प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा , बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा, प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा, संदीपान भुमरे – पैठण विधानसभा, रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा, वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा यांचा समावेश आहे.

राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.