Pune Crime News | पुणे: आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाचा खून, गुन्हे शाखेकडून 24 तासात आरोपी गजाआड (Video)

0

पुणे : Pune Crime News | बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरुन तरुणाला निर्जनस्थळी नेऊन लाकडी दांडक्याने व धारदार हत्याराने बेदम मारहाण करुन खून केला. ही धक्कादायक घटना वानवडीतील लुल्लानगर (Lulla Nagar Wanwadi) भागात असलेल्या लष्कराच्या मोकळ्या जागेत सोमवारी (दि.24) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली होती. गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने तपास करुन खून झालेल्या तरुणाची ओळख पटवून दोन आरोपींना 24 तासात बेड्या ठोकून गुन्हा उघडकीस आणला आहे. (Murder In Wanwadi Pune)

https://www.instagram.com/reel/C8pEuQPJkY4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

माविया लियाकत हुसेन पठाण (वय-22 रा. अश्रफनगर, गल्ली नं. 11, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अरविंद अमृत कांबळे (वय 26 रा. जी.एस. टॉवर बिल्डींग, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे), रोहीत हनुमंत पुटगे (वय-19 रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी अमृत कांबळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर बिबवेवाडी (Bibvewadi Police Station), वाकड (Wakad Police Station), मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) गुन्हे दाखल आहेत.

सोमवारी रात्री विक्रम बात्रा वसाहत समोरील केंद्रीय महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्य मैदानात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच युनिट पाच च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मयत तरुणाच्या मोबाईल मधील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मयत तरुण हा कोंढवा, वानवडी भागातील असल्याने त्या भागातील समाजसेवक व बातमीदार यांना माहिती दिली असता तरुणाची ओळख पटली.

तपासादरम्यान माविया पठाण याचे अरविंद कांबळे यांच्यात कौटुंबिक वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने कांबळे याच्या घरी गेले असता घराला कुलुप असल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेत असताना अरविंद कांबळे व त्याचा मित्र रोहीत पुटगे हे बुलेट मोटरसायकलवरुन कर्नाटकात जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अविनाश लाहोटे यांना मिळाली. त्यानुसार कान्हे हॉटेल चौकात नाकाबंदी केली असता आरोपी पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. पथकाने त्यांना चारीबाजून घेरून ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, अरविंद याच्या बहिणीने दीड वर्षापूर्वी माविया लियाकत पठाण याच्यासोबत प्रेम विवाह केला होता. मात्र, तो तिला त्रास देत होता. त्याला अनेक वेळा समजावून सांगितले. मात्र, त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्याला सोडचिठ्ठी देण्यास सांगितले तरी तो सोडचिठ्ठी देत नव्हता. त्यामुळे सोमवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास त्याला बुलेटवरुन उचलून नेले. त्याला लुल्लानगर येथे निर्जन स्थळी नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. (Pune Crime Branch)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडूळे, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अमित कांबळे, रमेश साबळे, अकबर शेख, पांडूरंग कांबळे, स्वाती गावडे, शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.