Loni Kalbhor Pune Crime News | पुणे: शाळकरी मुलीचा पाठलाग करुन काढले फोटो, ब्लॅकमेल करुन केले असभ्य वर्तन

0

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | क्लास मधून घरी जाणाऱ्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग केला. तिला जबरदस्तीने थेऊर येथील नर्सरीत घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला नातेवाईकाच्या घरी नेऊन तिला एका खोलीत बंद करुन मारहाण करत असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे (Molestation Case). हा प्रकार लोणी काळभोर आणि अहमदनगर येथे एप्रिल 2023 ते 24 जून 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 16 वर्षाच्या पिडित मुलीने मंगळवारी (दि.25) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station)फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय नामदेव नेटके Akshay Namdev Netke (वय-26 रा. हिसरे, ता. करमाळा जि.अहमदनगर) याच्या विरोधात आयपीसी 354, 354(ड), 342, 323, 506, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी क्लास मधून घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीची दुचाकी रस्त्यात अडवून तिला जबरदस्तीने थेऊर येथील एका नर्सरीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीला अहमदनगर येथील नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी एका खोलीत मुलीला डांबून ठेवून तिला मारहाण केली. तसेच तिच्यासोबत असभ्य वर्तन करताना फोटो काढले. त्यानंतर आरोपीने त्याच्या भाची सोबत पीडित मुलीला चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून त्यावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.