Sharad Pawar NCP On Ajit Pawar | ‘वैयक्तिक स्वार्थासाठी सतत दिल्लीवाऱ्या करणाऱ्या अजित पवारांनी…’; GST परिषदेवरून शरद पवार गटाची टीका

0

पुणे : Sharad Pawar NCP On Ajit Pawar | जीएसटी परिषदेच्या बैठकीत व्यावसायिक सुविधा आणि करदात्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. लहान करदात्यांची जीएसटीआर-४ ची अंतिम मुदत,आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परीषदेची (GST Council) ५३ वी बैठक नुकतीच पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत व्यावसायिक आणि करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. यावरून शरद पवार गटाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

जीएसटी कौन्सिल परिषदेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी एक्स पोस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही पोस्ट रिट्वीट करत शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावरून टीका करण्यात आली आहे. “केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक जीएसटी जमा करणारे महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.

परंतु महाराष्ट्राच्या हिताचा प्राधान्याने एकही निर्णय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या ५३ व्या बैठकीत घेण्यात आलेला नाही. परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी सरकार ३.० चे रेटून कौतुक करता आहेत. असे शरद पवार गटाने म्हंटले आहे.

” इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिल्लीतील जीएसटी कौन्सिल बैठकीत उपस्थित राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडणे अपेक्षित होते. परंतु एरव्ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत दिल्लीवाऱ्या करणाऱ्या अजित पवारांनी महत्वाच्या जीएसटी बैठकीस उपस्थित राहण्यास मात्र नापंसदी दर्शवली. महायुती सरकारचा हा ढोंगीपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही” अशी टीका करत शरद पवार गटाने अजित पवारांवरही निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.