SEBI On Quant Mutual Fund | प्रसिद्ध म्युच्युअल फंडावर SEBI ला संशय, होतेय मोठी गडबड! आता काय होणार तुमच्या पैशाचे?

0

नवी दिल्ली : SEBI On Quant Mutual Fund | देशाचे मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी (SEBI) ने संदीप टंडन यांच्या मालकी हक्काच्या क्वांट म्युच्युअल फंड (Quant Mutual Fund) वर फ्रंट-रनिंगच्या संशयाखाली तपास आणि जप्तीची कारवाई केली. तपास आणि जप्तीची कारवाई मुंबई आणि हैद्राबाद या दोन ठिकाणी करण्यात आली. सूत्रांनी मनी कंट्रोलला ही माहिती दिली आहे.

एका सूत्राने दुजोरा दिला की, क्वांट म्युच्युअल फंडच्या मुंबई मुख्यालयासह हैद्राबादमध्ये सुद्धा छापेमारी केली. शुक्रवार, २१ जूनला क्वांट डिलर्स आणि प्रकरणाशी संबंधीत लोकांची चौकशी करण्यात आली.

देखरेख पथकाने पकडला संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्न

सूत्रांनी म्हटले की, ऑपरेशन्समधून प्रॉफिट जवळपास २० कोटी रुपये आहे आणि सेबीने आपल्या देखरेख पथकाने संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्न पकडल्यानंतर फंड हाऊसच्या ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे.

क्वांट म्युचुअल फंडची स्थापना संदीप टंडन यांनी केली आहे. या फंडला २०१७ मध्ये सेबीकडून म्युच्युअल फंड लायसन्स मिळाले. हा देशात सर्वात वेगाने वाढणारा म्युच्युअल फंड ठरला आहे, ज्याची असेट्स २०१९ मध्ये १०० कोटी रुपयांवरून वाढून सध्या ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. २६ स्कीम्स आणि ५४ लाख फोलियोच्या पोर्टफोलियोसह यावर्षी जानेवारीमध्ये त्याने ५०,००० कोटी रुपयांची असेट्स पार केली.

काय आहे फ्रंट-रनिंग?

फ्रंट रनिंगचा अर्थ अशा अवैध हालचालींशी आहे, जिथे फंड मॅनेजर/डिलर/ब्रोकर यांना येत असलेल्या मोठ्या ट्रेडबाबत माहिती असते आणि या आधारावर ते अगोदरच ऑर्डर करतात आणि प्रॉफिट कमावतात. मार्केट रेग्युलेटर सेबी फ्रंट रनिंग संपवण्यासाठी म्युच्युअल फंडावर आक्रमक पद्धतीने कारवाई करत आहे.

गुंतवणुकदारांचे होऊ शकते नुकसान

फंड मॅनेजर अथवा कंपनीच्या घोटाळ्याने गुंतवणुकदारांचे नुकसान होऊ शकते. घोटाळ्यामुळे अशा फंडांची विश्वासार्हता घसरू शकते आणि गुंतवणुकदार त्याच्यातून पैसे काढू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.