PMC Merged Villages | समाविष्ट गावांतील शाळांसाठी पवित्र पोर्टल, आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेतील शिक्षकांची भरती होणार

0

पुणे : – PMC Merged Villages | समाविष्ट तेवीस गावांतील जिल्हा परिषदेच्या ६५ शाळा महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. मागील आठवड्यात शाळा सुरू झाल्या असून पुढील दोन दिवसांत या शाळांमधील शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. या शाळांसाठी साधारण पाचशेहून अधिक शिक्षकांची गरज असून पवित्र पोर्टलद्वारे २४०, आंतरजिल्हा बदलीतून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या १२९ शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने करण्यात येणार असून उर्वरीत शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी दिली.

महापालिकेमध्ये चार वर्षांपुर्वी २३ गावांचा समावेश करण्यात आला. या गावातील मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेच्यावतीने करण्यात आली. मात्र, आतापर्यंत या गावांतील शाळा जिल्हा परिषदेकडून चालविण्यात येत होत्या. या शाळांतील शिक्षकांनी त्यांची सेवा महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग करावी या मागणीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. याला जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचाही विरोध होता. यामुळे परिस्थिती जैसे थे होती. मात्र, नुकतेच न्यायालयाने शिक्षकांना महापालिकेकडे वर्ग करण्याच्या विरोधात निकाल दिला आहे. अशातच १४ जूनला शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शिक्षकांअभावी या शाळा सुरू ठेवण्यात येणार्‍या अडचणींचा विचार करून प्रशासनाने पवित्र पोर्टलवरून २६० शिक्षक, आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेतील साधारण १२९ शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरीत जागा या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.