Paytm Wallets Closing | पुढील महिन्यात बंद होतील हजारो Paytm वॉलेट, यादीत तुमचे नाव आहे का? चेक करा

0

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी आरबीआय (RBI) ने केवायसी नियमांचे पालन न केल्याने पेटीएम पेमेंट्स बँके (Paytm Payments Bank) वर प्रतिबंध लावला होता. आता पेटीएम बँके (PPBL) ने काही पेटीएम वॉलेट बंद करण्याबाबत वक्तव्य केले आहे. एका अंदाजानुसार पेटीएमने केलेल्या या घोषणेचा परिणाम हजारो ग्राहकांवर पडू शकतो (Paytm Wallet Closing).

पेटीएमने म्हटले की, झीरो बॅलन्स आणि एक वर्षापेक्षा जास्त काळापासून कोणतेही व्यवहार न केलेले वॉलेट २० जुलै, २०२४ ला बंद केले जातील.

३० दिवस आधी नोटी पाठवली जाईल

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, इनअ‍ॅक्टिव्ह पेटीएम वॉलेट बंद करण्याची सूचना ३० दिवस आधी ग्राहकांना पाठवली जाईल.

बॅलन्स वापरू शकतात यूजर्स

इनअ‍ॅक्टिव्ह वॉलेटमधील बॅलन्स ग्राहक वापरू शकतात अथवा काढू शकतात. ग्राहकांचे अकाऊंट अथवा वॉलेटमध्ये जमा पैशांची सुरक्षितता कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही.

पेटीएम पेमेंट्स बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, ग्राहकांनी आपले इनअ‍ॅक्टिव्ह अकाऊंट आणि वॉलेट अ‍ॅक्टिव्ह करावे अथवा बंद करावे. शेवटच्या तारखेपर्यंत असे न केल्यास अकाऊंट आणि वॉलेट आपोआप बंद केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.