LIC Saral Pension Plan | LIC Scheme : जबरदस्त योजना… एकदाच लावा पैसे, दर महिना मिळेल १२०००/- रुपये पेन्शन!

0

नवी दिल्ली : एलआयसी सरल पेन्शन प्लान (LIC Saral Pension Plan) एक अशी योजना आहे, जी निवृत्तीनंतर दरमहिना पेन्शनची गॅरंटी देते. तिचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये केवळ एकदा गुंतवणूक करावी लागते आणि आयुष्यभर तुम्हाला पेन्शन मिळत राहील. एलआयसी सरल पेन्शन प्लान निवृत्ती योजना म्हणून विशेष लोकप्रिय आहे. दर महिन्याला हमखास पेन्शन देणारी ही योजना निवृत्तीनंतरच्या गुंतवणूक नियोजनात बसते.

LIC सरल पेंशन योजनेचे वैशिष्ट

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत ४० वर्षापेक्षा कमी वयाचा व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. मात्र, तुम्ही ८० वर्षापर्यंत यामध्ये कधीही गुंतवणूक करू शकता. या पॉलिसी अंतर्गत मंथली १००० रुपयाची एन्‍युटी खरेदी करावी लागते. तर तिमाही अंतर्गत किमान ३००० रुपये, सहामाही अधारावर ६००० रुपये आणि वार्षिक आधारावर १२००० रुपयांची एन्‍युटी घ्यावी लागते.

कशी मिळेल मासिक १२००० रुपये पेन्शन

एलआयसी सरल पेन्शन प्‍लानमध्ये तुम्ही किमान १२,००० रुपये वार्षिक एन्यूटी खरेदी करू शकता. या पॉलिसीत कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हवी तेवढी गुंतवणूक करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. या योजनेत कोणीही व्यक्ती एकादा प्रीमियम भरल्यानंतर वार्षिक, सहामाही, तिमाही अथवा मासिक आधारावर पेन्शन मिळवू शकतो.

तो या एकरकमी गुंतवणुकीतून एन्युटी खरेदी करू शकतो. एलआयसी कॅलक्युलेटरच्या हिशोबाने जर एखाद्या व्यक्तीने ४२ व्या वर्षी ३० लाख रुपयांची एन्यूटी खरेदी केली, तर त्यास प्रत्येक महिन्याला १२,३८८ रुपये पेन्शन मिळेल.

कर्जाची सुद्धा सुविधा

कुटुंबातील कोणी गंभीर आजारी पडले तर पॉलिसी घेतल्याच्या सहा महिन्यानंतर ही पॉलिसी सरेंडर करू शकता. तसेच सहा महिन्यानंतर या पॉलिसीवर कर्जदेखील घेऊ शकता. हा प्लान ऑनलाईन खरेदी करण्यासाठी एलआयसीची अधिकृत वेबसाईट www.licindia.in ला भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.