HDFC Bank च्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, इतक्या रक्कमेचे UPI ट्रांजक्शन केल्यास येणार नाही SMS

0

नवी दिल्ली : एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट आणली आहे. बँकेच्या ग्राहकांना एका ठराविक रक्कमेपेक्षा कमी रक्कमेचे यूपीआय ट्रांजक्शन (UPI Ttransaction) केल्यास एसएमएस मिळणार नाही. हा निर्णय २५ जून, २०२४ पासून लागू होत आहे.

बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, २५ जून, २०२४ पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सर्विसमध्ये काही बदल केले जात आहेत. जर तुम्ही कोणाला यूपीआयद्वारे १०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली, तरच एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. याशिवाय, जर तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली तरच एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. मात्र, सर्व प्रकारच्या ट्रांजक्शनसाठी ईमेल अलर्ट पाठवले जातील.

एचडीएफसी बँक एसएमएसबाबत बदल का करतेय?

बँकिंग रेग्युलेशन अंतर्गत ५,००० रुपयांपेक्षा जास्त प्रत्येक ट्रांजक्शनसाठी टेक्स्ट मेसेज पाठवणे आवश्यक आहे. तरीही, अनेक बँका लो-वॅल्यूच्या डेबिटसाठी सुद्धा मेसेज पाठवतात.

बँकर्सनुसार, बल्क एसएमएस मेसेजचा दर ०.०१-०.०३ रुपये प्रति एसएमएस असते. रोज यूपीआय ट्रांजक्शन जवळपस ४० कोटी होतात, तर बँका दररोज टेक्स्ट मेसेज अलर्टवर अनेक कोटी खर्च करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.