Millionaires Left India | यावर्षी 4300 श्रीमंत सोडणार भारत, जाणून घ्या कारण आणि कुठे होणार स्थायिक

0

नवी दिल्ली : Millionaires Left India | भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे आणि यामध्ये श्रीमंतांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. मात्र, मोठ्या संख्येत दरवर्षी देशातून करोडपतींचे पलायन देखील सुरू आहे. हेनले आणि पार्टनरने अशा १० देशांची यादी जारी केली आहे, जेथून २०२४ मध्ये सर्वात जास्त एचएनआय बाहेर जाऊ शकतात आणि यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चीन सर्वात पुढे आहे.

हेनले अँड पार्टनर्सच्या प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन २०२४ च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, यावर्षी भारतातून ४३०० करोडपती बाहेर पडून इतर देशात स्थायिक होऊ शकतात. टॉप-१० देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२०२४ मध्ये इतके श्रीमंत सोडू शकतात हे देश –

१. चीन – १५,२००
२. ब्रिटन – ९,५००
३. भारत – ४३००
४. साऊथ कोरिया – १२००
५. रशिया – १०००
६. ब्राझील – ८००
७. साऊथ अफ्रीका – ६००
८. तैवान – ४००
९. नायजेरिया – ३००
१०. व्हिएतनाम – ३००

करोडपतींचे आवडते ठिकाण बनतेय दुबई
हेनले अँड पार्टनर्सनुसार, श्रीमंतांचे सर्वात आवडते ठिकाण दुबई म्हणजेच यूएई बनत आहे. अंदाज आहे की यावर्षी ६,७०० एचएनआय येथे स्थायिक होऊ शकतात.

तर अमेरिकेत ३८०० करोडपती आपले घर बनवू शकतात. अशा देशांच्या यादीत पुढील नाव सिंगापुर (३५००), कॅनडा (३२००), ऑस्ट्रेलिया (२५००), इटली (२२००), स्विझर्लंड (१५००), ग्रीस (१२००), पोर्तुगालमध्ये ८०० आणि जपानमध्ये ४०० करोडपती स्थायिक होऊ शकतात.

श्रीमंत लोक का सोडतात आपला देश?

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अखेर हे श्रीमंत लोक आपला देश सोडून अन्य देशात का जातात. कारण, भारतात टॅक्ससंबंधीत नियमातील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून निघून चालले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.