Clash Between Two Factions Of BJP | पुण्यातील शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात हाणामारी? व्हिडिओ व्हायरल

0

पुणे : Clash Between Two Factions Of BJP | पुण्यातील प्रसिद्ध शंकर महाराज मठात (Shankar Maharaj Math) भाजपच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. पण भाजपने अशा प्रकारे कसलीच मारहाण झाली नसल्याचे म्हंटले आहे. पुण्यातील सातारा रोडवरील (Pune-Satara Road) धनकवडी (Dhankawadi) या ठिकाणी हा शंकर महाराज मठ आहे.

राज्यभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या मठात भाजपच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यामुळं इथल्या भाविकांमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळतेय. तसेच या प्रकाराकडे मठ प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचा भाविकांचा आरोप आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मठात येऊन एकमेकांविरोधात अशा प्रकारे राडेबाजी करणे योग्य नसल्याचे भाविकांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.