Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर; निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार

0

मुंबई : Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे . त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. २ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जुलै च्या आधी ही मतदान प्रक्रिया पार करायची आहे. ११ सदस्यांचा विधानपरिषदेच्या कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) केला जात आहे. त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

नोटिफिकेशन : मंगळवार २५ जून २०२४

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : २ जुलै २०२४

उमेदवारी अर्जांची छाननी : ३ जुलै २०२४

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ५ जुलै २०२४

मतदान : १२ जुलै २०२४

मतदानाची वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

मतमोजणी : शुक्रवार १२ जुलै २०२४ संध्याकाळी ५ वाजता

निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक : मंगळवार १६ जुलै २०२४

Leave A Reply

Your email address will not be published.