Sassoon Hospital | ससूनला नवीन डीन मिळणार; वैद्यकीय शिक्षण विभागाकडुन घोषणा

0

पुणे: Sassoon Hospital | ससून रुग्णालयाला पूर्णवेळ अधिष्ठाताची गरज असून त्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडुन घोषणा करण्यात आली आहे. पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरबदल (Blood Sample Tampering Case Pune) केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सेवेतून निलंबित केले होते. तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्या ठिकाणी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के (Dr Chandrakant Mhaske) यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. त्यामुळे ससून रुग्णालयाला पूर्णवेळ अधिष्ठाताची गरज होती.

या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की , ” डॉ म्हस्के यांच्याकडे दोन मोठ्या रुग्णालयाचा कार्यभार होता. दोन्ही ठिकाणचा कार्यभार सांभाळताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ससून रुग्णालयाला नवीन अधिष्ठाता देण्यात येणार आहे. दोन ते तीन प्राध्यापकांची नावे सचिव आणि आयुक्तांनी निवडली आहे. त्यापैकी एकाला ससूनचा कार्यभार दिला जाईल.” अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.