Penalty Of No Parking | नियमबाह्य पार्किंगवर कारवाई कशी करायची, पुणे पोलीस आयुक्तांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना

0

पुणे :- Penalty Of No Parking | वाहनचालक उपस्थित असताना ‘नो-पार्किंग’ (No Parking Fine) किंवा ‘राँग पार्किंग’ची (Worng Parking Fine) कारवाई केल्यास, त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग) दंड (Towing Charges) आता घेता येणार नाही. नियमबाह्य पार्किंगवर कारवाई कशी करायची, याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वाहतूकीस अडथळा निर्माण करुन बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ‘टोइंग व्हॅन’चा वापर करण्यात येतो. बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने उचलण्यासाठी एका खासगी कंपनीला काम दिले आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाई करताना ‘टोइंग व्हॅन’वर काम करणारे कामगार वाहनचालकासोबत अरेरावी करतात, अशा तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि.19) एक परिपत्रक जारी केले. पोलीस आयुक्तालयात ‘टोइंग’ करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना संबंधितांना दिल्या. (Pune Traffic Police)

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार, वाहन चुकीच्या ठिकाणी वा चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याबद्दल कारवाईच्या वेळी वाहनचालक जर त्याठिकाणी उपस्थित असेल तर गाडी ओढून नेण्याचा खर्च घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेकांना सम-विषम दिनांक पद्धत माहिती नेसते. काहीजण बाहेरगावाहून येतात. त्यामुळे त्यांना पार्किंग बाबत माहिती नसते. अशा वेळी वाहनचालक कारवाईच्या वेळी उपस्थित असून देखील चुकीच्या पद्धतीने गाडी लावण्यासाठी केलेल्या कारावाईबरोबरच ‘टोइंग व्हॅन’चा दंडही वाहन चालकाकडून आकारला जातो. त्यामुळे याला आता आळा बसणार आहे. तसेच, सम-विषम दिनांक विचारात न घेता वाहन लावल्याचे आढळून आले तर टोइंग व्हॅन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबती घोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी ई-चलन यंत्र आणि वॉकीटॉकी बाळगावी, असेही निर्देश पोलीस आयुक्तांनी बैठकीत दिले आहेत.

नो-पार्किंग दंड (टोईंग चार्जसह)

दुचाकी -500 रुपये दंड (जीएसटी सह), टोइंग चार्ज -285 एकूण दंड – 785 रुपये

चारचाकी – 500 रुये दंड (जीएसटी सह), टोइंग चार्ज 571 एकूण दंड 1 हजार 071 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.