Maharashtra Assembly Elections 2024 |विधानसभेसाठी 127 जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण; जरांगे पाटलांचा विधानसभेचा प्लॅन

0

बीड: Maharashtra Assembly Elections 2024 | राज्यात मराठा (Maratha Samaj) आणि ओबीसी समाज (OBC Samaj) आमने-सामने आले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आपल्या मागण्यांना घेऊन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालांनंतर पुन्हा उपोषणाला बसले होते. मात्र सरकारकडून (Mahayuti Govt) शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर एक महिन्याचा अवधी देत उपोषण स्थगित करण्यात आले. ओबीसी प्रवर्गातून (OBC Quota) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढण्याला मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.

विहित वेळेत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत, असे जाहीर करून त्याअनुषंगाने १२७ जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्याचवेळी मी स्वत: निवडणूक लढविणार नाही, असे जरांगे यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे.

सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आमचा १२७ जागांवरील पहिला सर्व्हे पूर्ण झालेला आहे. स्वत:चा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष उमेदवार असणार, याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

परंतु वेळ पडली तर मराठा, मुस्लिम, दलित आणि लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढविणार, असे जरांगे यांनी सांगितले. त्याचवेळी आपण स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नसू, हे स्पष्टपणे जरांगे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.