Pune Crime News | पुणे: आईसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या युवकाला मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल; तिघांना अटक

0

पुणे : Pune Crime News | आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरुन एका युवकाला बेदम मारहाण करुन त्याचे दात पाडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.17) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संचेती हॉस्पिटल चौकात (Sancheti Hospital Chowk) घडला आहे.

रमजान मंगल शेख (वय-38 रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याने दिलेल्या तक्रारीवरुन किरण कैलास कांबळे (वय-31), राहुल ज्ञानेश्वर लोंढे (वय-31 रा. पाटील इस्टेट) यांच्यावर आयपीसी 325, 341, 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन राहुल लोंढे याला अटक केली आहे. आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये रमजान याचे दोन दात पडले.

तर किरण कांबळे याने दिलेल्या तक्रारीवरुन रमजान मलंग शेख, रुस्तम मलंग शेख यांच्यावर आयपीसी 325, 341, 323, 504, 506 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच रमजान याने किरणच्या गुडघ्याचा चावा घेऊन लचका तोडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.