Lonavala – Heavy Vehicles Ban | लोणावळ्यात कायमस्वरूपी दिवसा जड वाहनांना बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

लोणावळा : Lonavala – Heavy Vehicles Ban | जड वाहनांमुळे लोणावळा शहरात गंभीर अपघात झाले आहेत. लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र आणि खंडाळ्यातील बॅटरी हिल दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून मुंबई पुणे महामार्गावरून (Mumbai Pune Highway) जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरातून जाणाऱ्या जड वाहनांनी द्रुतगती मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळा शहरात होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणारी जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत. लोणावळा शहरात दिवसा जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी दिले आहेत.

लोणावळा, खंडाळा परिसरात वर्षाविहारासाठी मुंबई- पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शनिवार आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी असते. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर ट्रक, कंटेनर करतात.

जड वाहतुकीमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन लोणावळा शहरात ठिकठिकाणी कोंडी होते. लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा यावेळीत सर्व प्रकारच्या जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.