Indian Asset To Increase | पुढील 5 दशकात 10 पट वाढेल भारताची संपत्ती, NSE प्रमुखांनी कोणत्या विश्वासावर केले हे वक्तव्य

0

नवी दिल्ली : Indian Asset To Increase | नॅशनल स्टॉक एक्सचेंज National Stock Exchange (NSE) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान (NSE CEO Ashish Kumar Chauhan) यांनी बुधवारी विश्वास व्यक्त केला की, तरूणांची संख्या आणि तंत्रज्ञान विकासाच्या बळावर पुढील ५० वर्षात भारताची संपत्ती १,००० टक्के वाढेल.

चौहान यांनी अहमदाबादच्या जवळ भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) च्या २३व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले, यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, भारत पुढील ५० वर्षात तरूणांची संख्या, तीव्र तंत्रज्ञान विकास आणि आपल्या उद्योजकांच्या बळावर खुप प्रगती करणार आहे. पुढील ५० वर्षात भारताची संपत्तीत १,००० टक्के म्हणजे दहा पट वाढ होणार आहे. मात्र, भारतात अजूनही गरीबी, शिक्षणाचा अभाव, खराब राहणीमान, राहण्याची स्थिती, अन्न, पाणी, स्वच्छतेची कमतरता आणि अपुरी आरोग्य सेवा यासारख्या सामाजिक-आर्थिक आव्हाने आहेत.

त्यांनी संस्थेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना परिवर्तनाचे वाहक होणे आणि बदल आणण्यासाठी नवीन व प्रभावी उपाय शोधण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.