Vadgaon Maval Pune Crime News | पुणे: मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने हल्ला, आरोपी गजाआड

0

वडगाव मावळ/पुणे : – Vadgaon Maval Pune Crime News | मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणीवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attack On Young Woman) केल्याची घटना वडगाव मावळ परिसरात घडली आहे. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी (Vadgaon Maval Police Station) एकाला अटक केली आहे. ही घटना कान्हे फाटा (Kanhe Phata) येथे घडली आहे. याप्रकरणी जखमी लक्ष्मी माताप्रसाद वाल्मीकी (वय-25) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष मारुती लगली (वय-43) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी कान्हे येथील एका कंपनी कॅन्टीनमध्ये एकत्रित काम करतात. आरोपीने फिर्यादी यांच्याकडे मोबाईल क्रमांक मागितला. मात्र, फिर्यादी यांनी मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने सोमवारी (दि.17) सकाळी आठच्या सुमारास फिर्यादीच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम (PI Kumar Kadam) यांच्या मागर्गदर्शनाखाली वडगाव पोलीस करीत आहेत.

तरुणीकडे शरीर सुखाची मागणी

चाकण : तरुणीच्या घरात घुसून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन अश्लील वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार चाकण परिसरात घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) उमेश उर्फ प्रेम भगवान सोळंखे Umesh alias Prem Bhagwan Solankhe (वय-31 रा. खेड) याच्यावर आयपीसी 354,354(अ),354(ड) ,506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 16 जून रोजी पिडीत तरुणीच्या घरात घडला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.