Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: गुंतवणुकीवर 10 टक्के परताव्याचे आमिष, मित्राने घातला लाखोंचा गंडा

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष (Lure Of Extra Money) दाखवून काळेवाडी (Kalewadi) येथे राहणाऱ्या 49 वर्षीय व्यावसायिकाची 3 लाख 50 हजाराची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 17 जून 2024 या कालावधीत हिंजवडी फेज-2 येथील गेरा कॉम्प्लेक्स (Gera Complex Hinjewadi) येथे घडला आहे.

याबाबत जयदेव हरजनदार डेम्ब्रा (वय-49 रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विनीत विजय भोमे Vinit Vijay Bhome (रा. मानिक चौक, राजगुरुनगर) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांचे मित्र आहेत.

विनीत याने फिर्यादी जयदेव यांना शेअर मार्केटचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. माझ्याकडे अनेक लोकांनी पैसे गुंतवणुक केल्याचे सांगितले. तसेच फिर्य़ादी यांना शेअर्स मार्केटबाबतची माहिती देऊन गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के नफा मिळवून देतो असे सांगितले. आरोपीने फिर्यादी यांना गेरा कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात नेले. त्याठिकाणी कामाची माहिती देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी विश्वासाने विनीत भोमे याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी साडे तीन लाख रुपये दिले. मात्र, विनीत याने आजपर्यंत कोणताही परतावा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.