Mundhwa Pune Crime News | पुणे: सासरवाडीत जाणे पडले महागात, जावयाला बेदम धारदार शस्त्राने मारहाण

0

पुणे : Mundhwa Pune Crime News | पुण्यात एका जावयाला त्याच्या सासरवाडीत जाणे चांगलेच महागात पडले आहे. समजावून सांगण्यासाठी गेलेल्या जावयावर सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले (Attempt To Kill). ही घटना पुण्यातील मुंढवा परिसरात सोमवारी (दि.16) घडली. मारहाणीत जावई गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत विशाल सिद्राम गायकवाड (वय-34 रा. म्हसोबा नगर, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मेहुणा संतोष जाधव (वय-26 रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा), साडु दत्ता गायकवाड, मेव्हण्याचा मुलगा समर्थ गुडरेड्डी यांच्यावर आयपीसी 307, 506, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संतोष जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल गायकवाड यांची पवार वस्ती येथे सासुरवाडी आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते सासुरवाडीतील लोकांना समजावून सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी यांच्या सोबत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी विशाल यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी धारदार शस्त्राने व लोखंडी पाईपने छातीवर, मानेवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तर अंजु यमनुर जाधव (वय-53 रा. केशवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल सिद्राम गायकवाड (वय-34 रा. म्हसोबा वस्ती, केशवनगर) याच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आला. त्याने तुम्ही माझी तक्रार का करता असे बोलून फिर्यादी व त्यांचा मुलगा संतोष याला शिवीगाळ केली. तसेच धमकी देऊन संतोष याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.