Manoj Jarange Patil On Omraje Nimbalkar | ‘मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका’; मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप

0

धाराशिव : Manoj Jarange Patil On Omraje Nimbalkar | ओबीसी प्रवर्गातून (OBC Quota) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे आग्रही आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिल्यांनतर एक महिन्यासाठी त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. दरम्यान धाराशिवचे (उस्मानाबाद) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation Andolan) एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ केंद्र सरकारच सोडवू शकते, ही गोष्ट केंद्र सरकारच्या हातात आहे”, असे शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले होते. “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवावी”, अशी मागणी देखील राजेनिंबाळकर यांनी केली होती. राजेनिंबाळकरांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, “कदाचित ओम राजेनिंबाळकर यांना काही माहिती नसेल. मराठ्यांनी ओबीसीमधून (कुणबी जातप्रमाणपत्रासह) आरक्षणाची मागणी केली आहे. याचाच अर्थ आम्हाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण हवं आहे आणि आम्ही ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण यात मुसळ घालू नये. बोलायचं असेल तर नीट बोला, नाहीतर बोलू नका.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलायचं असेल तर नीट बोला नाहीतर गप्प बसा. उगाच काहीही बोलून मराठ्यांच्या अन्नात माती कालवायचं काम करू नका. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी आम्ही केली आहे आणि तेच आमच्या हक्काचं आरक्षण आहे. मराठे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत आहेत “असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.