Dhyansagar Foundation | ज्ञानसागर पुरस्कार 2024 प्रदान समारंभ ! 10 वी – 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

पुणे : खडकीतील (Khadki) ज्ञानसागर फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने खडकी आणि परिसरातील 16 शाळेतील 350 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खडकी विभागातून सर्वप्रथम नक्षत्र मित्तल, द्वितीय युसरा कुडसी, तृतीय दिशा पिल्ले. या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सायकल भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी खडकी आणि परिसरातील विविध क्षेत्र आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना फाउंडेशनच्या वतीने “ ज्ञानसागर पुरस्कार 2024 “ देऊन गौरविण्यात आले पुरस्कारार्थी आप्पा हातनुरे संचालक लोकसेवा प्रकाशन, राजेश शर्मा वंदेमातरम संघटना महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष राष्ट्र भक्ति रुजविण्याचे कार्य शैलेश काळे पत्रकारिता,मंनजितसिंग विरदी अंध,अपंग, अनाथ आश्रमातील मुलांसाठी कार्य अनिता पवार महिलांचा सक्षमीकरणासाठी आरोग्य विषयक जागृती पूजा आनंद सामाजिक कार्य चेतन माने युवा उद्योजक
मिथीलेश बाडोलिया दिल्ली येथील किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेता गवळी वाडा तरुण मंडळ (सामाजिक प्रबोधन पर कार्य) आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले

या कार्यक्रमाला बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद (Manish Anand), माजी मुख्याध्यापक रमेश वाळके सर, फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब आहेर, अध्यक्ष प्रा. डॉ. अभिषेक आहेर ई. खडकीतील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब आहेर यांनी केले उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक डॉ. अभिषेक आहेर, स्वीकृती (वाळके)आहेर यांनी केले उपस्थित पाहुण्याचे आभार आदित्य आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करूनेश जावळे, तनिष गर्ग, सोहम केदारी, साहिल नायर ,अथर्व पवार, मार्क दास, आमिर शाह यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.