Rajgad Pune Crime News | पुणे : नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, नातेवाईकांकडून विनयभंग; 5 जणांवर विनयभंग

0

पुणे : – Rajgad Pune Crime News | लग्नानंतर विवाहीत महिलेचा मानसीक व शारीरिक छळ करुन तिला माहेरच्यांकडून पैसे आणण्यास सांगितले. तसेच पतीला लैंगिक समस्या (Sexual Problem) असल्याचे लपवून ठेवून विवाहितेची फसवणूक केली (Cheating Fraud Case). तर नातेवाईकांनी अश्लील वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 25 वर्षीय महिलेने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पती, सासु-सासरे, नणंद व तिच्या पती विरोधात आयपीसी 498(अ), 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 मे 2023 ते 15 जून 2024 या कालावधीत लोणावळा व भांगरवाडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे 23 मे 2023 रोजी लग्न झाले. लग्नानंतर दीड महिन्यांनी पतीने दुचाकी व चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरच्यांकडून पैसे आणण्यास सांगितले. तसेच माहेरच्या प्रॉपर्टीमधील 25 टक्के हिस्सा घेण्यास सांगितले. दरम्यान, लग्नानंतर पतीच्या लैंगिक समस्येबाबत महिलेला समजले. त्यावेळी महिलेने याबाबत विचारणा केली असता पतीने महिलेला मारहाण करुन परपुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगून याबाबत कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. तसेच सासू-सासऱ्यांनी, नणंद व नंदावा यांनी दमदाटी केली. त्यानंतर नणंदेच्या पतीने शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.