Aundh Pune Crime News | पुणे : जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावाखाली पॅराडाईज हॉलीडे टुर्सकडून फसवणूक, तिघांना 11 लाखांचा गंडा

0

पुणे : – Aundh Pune Crime News | जम्मू काश्मीर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला 11 लाख रुपये दिले. मात्र, त्या टूर कंपनीने कोणत्याही ट्रिपचे आयजोन केले नाही तसेच घेतलेले पैसे परत न करता फसणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2024 ते अद्याप पर्यंत ब्रेमन चौकातील पॅराडाईज हॉलीडेज टुर्सच्या ऑफिसमध्ये घडला. (Cheating Fraud Case)

याबाबत अभिषेक माणिकराव ननावरे (वय-37 रा. कृष्णकुंज सोसायटी, गुलटेकडी, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविंद्र बाबाजी शेंडकर Ravindra Babaji Shendkar (पॅराडाईज हॉलीडे टुर्स – Paradise Holidays Tours And Travel , भक्ती प्लाझा, ब्रेमेन चौक, औंध) यांच्यावर आयपीसी 406, 420, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननावरे यांच्याकडून आरोपीने 70 हजार, राधेय संतोष दगडे यांच्याकडून 2 लाख 40 हजार आणि संतोष अरुण राऊत यांच्याकडून 7 लाख 90 हजार 797 रुपये घेतले. हा प्रकार 13 फेब्रुवारी ते 13 जून या कालावधीत घडला. पैसे घेतल्यानंतर आरोपीने जम्मू काश्मिरला जाण्यासाठी ठरल्याप्रमाणे सुविधा न देता, ट्रीप आयोजित न करता विश्वास घात करुन फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांनी शेंडकर याला पैशाची मागणी केली असता, त्याने धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.