Sharad Pawar On PM Narendra Modi | ‘विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा ‘मविआ’ला फायदा होईल’; शरद पवारांचा मोदींना टोला

0

मुंबई : Sharad Pawar On PM Narendra Modi | लोकसभा निवडणुकीप्रमाणे (Lok Sabha Election 2024) आगामी विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Elections 2024) मोठे यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार यावर तर्कवितर्क लावले जात होते.

मात्र आज मुंबईत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला.

“पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

“त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणे अनेक आहेत. पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.