Prithviraj Chavan – Maharashtra Assembly Elections | नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा; म्हणाले – “आगामी विधानसभा निवडणूका…”

0

मुंबई : Prithviraj Chavan – Maharashtra Assembly Elections | लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकही एकत्र लढवणार का? याबाबत चर्चा सुरु होत्या.

दरम्यान आज मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील (Jayant Patil), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, ” महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मविआला घवघवीत असा पाठिंबा मिळाला आहे. आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तर 30 हुन अधिक संघटना… कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष या सर्वांनी महाराष्ट्रात वातावरण निर्माण करण्यासाठी मोठा वाटा उचलला होता. “बलाढ्य शक्ती विरोधात आम्ही लढलो.. पूर्वी झालं नव्हतं तेवढं या वेळेस मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं होतं. यापुढच्या निवडणुकी आम्ही अशाच ताकदीने लढणार आहोत.” अशी भूमिका चव्हाणांनी स्पष्ट केली.

जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तशाच आणि त्यात ताकदीने आम्ही विधानसभा लढणार आहोत, असं चव्हाण म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, असं बोललं जात असतानाच बैठकीला उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.