Yerawada Pune Crime News | अंघोळ करताना महिलेचा शेजाऱ्याने काढला व्हिडिओ, येरवडा परिसरातील घटना

0

पुणे : – Yerawada Pune Crime News | पुण्यात अल्पवयीन मुलीसह महिलावर विनयभंग व अत्याचाराच्या धक्कादायक घटना घडत असताना एक संतापजनक घटना येरवडा परिसरात घडली आहे. एका 39 वर्षीय महिलेचा अंघोळ करताना चोरुन मोबाइलवर व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरुमच्या खिडकीतून आरोपीने व्हिडीओ काढला.

याबाबत 39 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वजित शंकर पाटील Vishwajit Shankar Patil (वय-24 रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354(क)(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे (Molestation Case). हा प्रकार गुरुवारी (दि.13) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील बाथरुमध्ये आंघोळ करत होत्या. त्यावेळी आरोपी याने बाथरुमच्या खिडकीतून चोरून फिर्यादी यांचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. महिलेने लगेच येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घरात घुसून महिलेसोबत असभ्य वर्तन

पुणे : घरात घसून एका महिलेचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील बोलून असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.10) रात्री आठच्या सुमारास पद्मावती परिसरात घडला आहे. याप्रकरणी पिडीत 22 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) युवराज जम्बू कांबळे Yuvraj Jambu Kamble (वय-23 रा. पद्मावती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिडीत महिलेने घरच्यांशी चर्चा करुन गुरुवारी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.