Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

0

पुणे : Ajit Pawar | लोकसभेच्या पराभवानंतर (Lok Sabha Election Results) सुनेत्रा पवारांची (Sunetra Pawar) राज्यसभेवर (Rajya Sabha) बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नव्हता त्यामुळे सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी अजित पवार, सुनील तटकरे (Sunil Tatkare), प्रफुल पटेल (Praful Patel) आणि छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. मात्र अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघेही उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊन तर्कवितर्क लावले जात आहेत.

यावर माध्यमांना बोलताना अजित पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळची व्यक्ती अमोल काळे, यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अस्तीविसर्जनासाठी त्यांना (देवेंद्र फडणवीस) नाशिकला जायचे होते. ते गेले दोन-तीन दिवस त्या दुःखात आहेत. याशिवाय, एकनाथ शिंदे यांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितले की, आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमच्या उमेदवाराचे नाव ठरेल. आम्ही सर्वजण जाऊन तो फॉर्म भरणार आहोत.

सर्वांनीच तो फॉर्म भरायला जायला हवे, असे काही मला वाटत नाही. ते म्हणाले हरकत नाही. महायुती तर बरोबर आहेच. त्यामुळे तुम्ही जाऊन फॉर्म भरा. मात्र तरी देखील बातम्या लावल्या. अरे… राष्ट्रवादीच होती… शिवसेनेचा शिंदे गट नव्हता… भाजप नव्हता… मी जर त्यांना बोलावलेलंच नव्हतं, जर एक घटना घडलेली असताना, ते दुःखात असताना, आपण चला-चला फॉर्म भरायला चला, असे म्हणणे मला योग्य वाटले नाही आणि निवडणूकही बिनविरोध होणार होती. कारण एकीकडे २०० मते होती आणि एकीकडे काही ७०-७५ मते होती. त्यामुळे आम्ही आपले गेलो.” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.