Uddhav Thackeray On BJP | सरसंघचालकांनी मणिपूरच्या घटनेवरून भाजपाचे कान टोचल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

0

मुंबई: Uddhav Thackeray On BJP | मणिपूर आणि काश्मीरमध्ये घडणाऱ्या (Manipur Violence) घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून भाजपावर हल्लाबोल केला आहे. सरसंघचालकांनी मणिपूरच्या घटनेवरून भाजपाचे कान टोचले आहेत. त्याचाच धागा पकडून ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मणिपूरवर एक वर्षाने मोहन भागवत (Mohan Bhagwat) बोलले, मणिपूरबाबत सरसंघचालकांनी जे काही सांगितले त्याला पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का?, सरसंघचालक बोलल्यानंतर तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार आहे का?

कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संघाची आम्हाला गरज राहिली नाही असं जेपी नड्डा म्हणाले होते. सध्या शपथविधी सोहळे सुरू आहेत. काश्मीरात हल्ले होतायेत. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मला सरकारच्या नाही तर देशाच्या भवितव्याची काळजी आहे. ४०० पार होणारे २४० वर अडकलेत. त्यामुळे मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं असा टोला ठाकरेंनी लगावला.

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या टिप्पणीवरही त्यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी नाही दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी नाही. संवादात थोडं लूज कनेक्शन होतं, कारण मी निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते.

दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही समझौता करतोय. निवडणूक झाल्या झाल्या मी इथं नव्हतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे सुरू होते. अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मणिपूच्या घटनेबाबत सरसंघचालक काय म्हणाले होते?

१० वर्षे शांत राहिलेलं मणिपूर गेल्या वर्षापासून अशांत आहे. गेले दहा वर्ष तिथं शांतता होती. अचानक तिथं अशांतता घडली. तिथं जे काही झालं, ते घडलं आहे की घडवलं आहे, असा प्रश्न आहे. तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या सधन घरातील महिला मद्यपान करून वाहन चालवतात आणि लोकांना चिरडतात. कुठं चालली आहे आपली संस्कृती. जगात ज्यांनी संस्कृती तयार केली, त्यांची ही स्थिती चांगली नाही, असं भागवत यांनी स्पष्ट केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.